चिवरी, दि. 15 : कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांची उपासमार होत आहे याचे गांभीर्याने विचार करून तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील माजी सैनिक विठ्ठल मारूती होगाडे यांच्या कडून गावातील गरजू लोकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील रुपेश बिराजदार सरपंच अशोक घोडके,उपसरपंच बालाजी पाटील, चेअरमन बालाजी शिंदे, सचिन बिराजदार, मारूती होगाडे रावसाहेब पाटिल,बालाजी झिंगरे, किसन देशमुख, शंकर झिंगरे ,प्रमोद साखरे, विश्वास बिराजदार, बाळु देडे, बाबासाहेब लोहार, शंकर बिराजदार, आशा कार्यकत्या अर्चना राजमाने, अनिता बिराजदार, आदीसह चिवरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.